अभिनेता योगेश सोहनीला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अज्ञातांकडून ५० हजारांची लूट केली असल्याचे समोर आले आहे.... शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता सोमटणे एक्झिटजवळ ही घटना घडली. अभिनेता योगेश सोहनी आपल्या फोर व्हिलरने जात असताना शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता सोमटणे एक्झिट जवळ ही घटना घडली होती...एक्सप्रेस वे वरून पुण्याला जात असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधील एका ड्रायव्हरने योगेशला गाडी थांबवण्याचा इशारा केला. ते पाहून कुठलाही विचार न करता योगेशने तात्काळ आपली गाडी थांबवली.
त्या ड्रायव्हरने योगेशला जाब विचारत तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे असे म्हटले. त्यामुळे एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. तुझ्यावर कायदेशीर तक्रार होऊ शकते जर असे नसेल करायचे तर एक लाख पंचवीस हजार रुपये दे....आम्ही तुझ्याविरुद्ध कुठलीही तक्रार करणार नाही असे म्हणून योगेशकडे भरभक्कम पैशाची मागणी केली....
#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber